गौरव समिति प्रतिनिधिमंडळ ने घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : राष्ट्रीय एकता आणि सर्व धर्म समभाव चे संयोजक ,विश्व शांतीदूत, विदर्भरत्न, प. पु.गुरुवर्य श्री अल्हाज असद बाबा सिंदखेडराजा यांच्या चाळीस वर्षांच्या निस्वार्थ अखंडित सेवेचा आणि उत्कृष्ट सामाजिक कार्याची भारत सरकार ने दखल घेऊन त्यांना मरणोपरांत “पद्मभूषण/ पद्म विभूषण पुरस्कार” मिळणे साठी गौरव समिति प्रतिनिधिमंडल ने राज्यपालांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. देशभरात लाखो बाबांचे सर्व धर्मीय चाहता वर्ग आहे सर्वांची इच्छा आहे की बाबांच्या कार्याची शासनाने दाखल घ्यावी आणि गौरव करावा त्यासाठी असनाज फाउंडेशन ने एक गौरव समिति प्रतिनिधिमंडळ या कार्यासाठी आमंत्रित केले. गौरव समिति प्रतिनिधिमंडळ तर्फे सुबोध सावजी, मुंबई रत्न डॉ अमजदखान पठान (कर्करोग शास्त्रज्ञ), स्वामी देवेंद्र महाराज (जैन मुनी), नुरुद्दिन सेववाला (डेप्युटी वर्ल्ड चेअरमन जायंट्स ग्रुप),जावेद पारेख (मेंबर दर्गा कमेटी),अल्पसंख्यक मंत्रालय भारत सरकार, डॉ सुकेश झंवर (संचालक बुलढाणा अर्बन बँक), डॉ राहुल सावजी (अध्यक्ष सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट) उपस्थित होते. सुबोध सावजी यांनी प्रस्तावना केली आणि असद बाबा यांनी समाजामध्ये शांतता, समता, बंधुता नांदावी म्हणून सर्व समाजातील लोकांनां एकत्र आणून शांततेचा आणि प्रेमाचा संदेश दिल्याचे सांगितले.

अल्हज असदबाबा यांचे जीवन कार्याचा परिचय डॉ. अमजद खान पठाण यांनी राज्यपाल यांच्या समोर वर्णन केला. अल्हज असदबाबा गेल्या चाळीस वर्षांपासून अखंडीत पणे राष्ट्रीय एकता आणि सर्वधर्म समभाव चे कार्य करीत होते. महाराष्ट्र राज्यातील संत परंपरेचा विचार तरुणांच्या प्रत्यक्ष व्यक्तिगत आचरणात आणून तरुणांमध्ये देशभक्ती, मानवता, धर्मनिरपेक्षता,समता निर्माण करून नवतरुण पिढीस आपली सामाजिक जबाबदारी ची जाणीव ठेऊन असद बाबा नेहमी योग्य मार्गदर्शन करत होते. कुष्ठरोग, कर्करोग आणि किडनी रोगने पीडित लोकांचा आधार बाबा बनले होते, बाबानी आपले सर्व आयुष्य लोकांसाठी आणि आपल्या देशासाठी समर्पित केले. लाखो लोकांना एकता, बंधुता, सामाजिक संगोपन, शांती आणि अखंडतेचा महा संदेश दिला. विदर्भ- मराठवाडा येथील गरजू रुग्णांसाठी सिंदखेड राजा येथे हजरत गौस ए आजम दस्तगीर बाबा बहुद्देशीय संस्था च्या माध्यमातून दस्तागिर बाबा दर्गा येथे गोर गरीब रुग्णांसाठी मोफत कर्करोग आणि किडनी रोग तपासणी आणि उपचार महाआरोग्य शिबिर चे आयोजन बाबा करत होते. लाखो गोर-गरीब रुग्णांना याचा फायदा झाला. राष्ट्रीय एकता, रुग्ण सेवा, अस्पृश्यता निवारण, अनिष्ट रूढी उच्चाटन, शिक्षण प्रसार, आरोग्य संवर्धन, वनीकरण, संस्कार क्षमता, महिला जागृति, बेटी पढ़ाओ बेटी बचाव हे कामाचे आयाम हाती घेत ते कार्य करत होते. आपल्या या जागतिक कार्यासाठी त्यांना जवळपास पाचशेहून अधिक पुरस्कार मिळालेले आहे. नुकताच “महात्मा गांधी लीडरशीप पुरस्कार” लंडन येथे देण्यात आला होते. तसेच महाराष्ट्र संयुक्त राष्ट्र संघटना ने देखील त्यांना गौरविले आहे.

असद बाबा यांना यापूर्वी ही राज्यस्तरीय, राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे. स्वामी देवेंद्रजी जैन मुनी यांनी आपण स्वतः सिंदखेड राजा येथे जाऊन असद बाबा यांचे कार्य बघितलेले असल्याचे सांगितले. जावेद पारेख आणि नुरुद्दिन सेववाला यांनी असद बाबा हे सर्व धर्मीय लोकांना कसे एकत्र आणून त्यांना प्रेमाचा आणि एकोप्याचा संदेश देत होते हे आपण प्रत्यक्ष बघितल्याचे सांगितले. शिष्ट मंडळाने राज्यपाल यांना सिंदखेड राजा मातृतीर्थ मध्ये येण्याचे आणि माँ जिजाऊ आणि हजरत गौस ए आजम दस्तगीर बाबा दर्गा मधे भेट देण्याचे आमंत्रण दिले आहे. आणि ते राज्यपाल महोदय यांनी स्वीकारले आहे. राज्यपाल यांनी हज़रत दस्तगीर बाबा दर्गा वार्षिक कार्यक्रम साठी आणि येत्या ६ सप्टेंबर रोजी अल्हाज असद बाबा यांच्या प्रथम पुण्यतिथि निमित्त महामहिम राज्यपाल यांनी पवित्र चादर समाधी वर अर्पण करण्यासाठी आपल्या हस्ते शिष्ट मंडला सुपूर्द केली .