October 6, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ

अल्पवयीन मुलीचा प्रियकरासोबत फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न…

मुलीची आई-वडीलांविरोधात पोलीसात तक्रार;गुन्हा दाखल..

खामगांव- लग्नाच्या एकदिवस आधी हळदीचा कार्यक्रम आटोपल्यावर १६ वर्षीय उपवर मुलीने घरुन निघून जात प्रियकरासह फिनाईल पिऊन थेट पोलीस स्टेशन गाठले. व आपले आई वडील इच्छेविरुध्द वय कमी असतांनाही लग्न लावून देत असल्याचे सांगितले.याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून आई-वडिलांविरुध्द बालविवाह अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील एका फैलात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचे याच परिसरातील १८ वर्षीय मुलावर प्रेम आहे. हे प्रेमप्रकरण माहित पडल्याने मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचे लग्न उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रत्नागिरी येथील एका मुलाशी तिचे लग्न ठरविले. लग्नाची तारीख ठरली.पत्रिका देखील वाटप झाल्या.८ मार्च रोजी सदर मुलीला हळद लागली.नातेवाईकांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात हळदीचा कार्यक्रम पार पडला. मुलीच्या घरी लग्नाची तयारी सुरु होती. मात्र हळदीचा कार्यक्रम आटोपल्यावर उपवर मुलीने घर सोडून प्रियकराची भेट घेतली. त्या दोघांनी फिनाईल प्राशन करून थेट शहर पोलिस स्टेशन गाठले.पोलिसांनी लगेच मुला-मुलीला सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून पोलिसांनी मुलीचे बयाण घेतले. त्यात मुलीने आपले आई-वडील बळजबरीने कमी वय असतानाही लग्न लावून देत आहेत. असे सांगितले. मुलीच्या या बयानावरुन पोलिसांनी तिच्या आई-वडीलांविरुध्द कलम ११ बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची शहरात चर्चा होत आहे.

Related posts

ओम ऑप्टिकल्स द्वारे सोशल डिस्टनसिंग बाबत जनजागृती

nirbhid swarajya

बस चा रॉळ तुटल्याने बस चढली बांधावर…

admin

शेगांव न.प.व्दारे शहरात स्वच्छतेबाबत कीर्तन व विविध माध्यमातुन केली जनजागृती…

nirbhid swarajya
error: Content is protected !!