संग्रामपूर प्रतिनिधी :- तालुक्यातील एकलारा बानोदा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला भारतीय नौदल सैनिक मोठया उत्साहात नागरिकांनी केला गौरव एकलार येथील दत्तात्रय गाडगे यांचा मुलगा आशिष गाडगे याने इयत्ता बारावी चे शिक्षण पूर्ण करून ध्यास, धडपड, सातत्य, प्रामाणिकपणा, कौशल्य, बुद्धिमत्ता, कठोर मेहनत, जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्ती यांच्या जोरावर माणूस यशाच्या शिखरावर जाण्यासाठी त्याने आपल्या वडिलाच नाव लौकीक करण्यासाठी तसेच देशाच्या रक्षणासाठी आपली जिद्द व वडिलांच्या कष्ट तुन घेतलेलं शिक्षण त्याने 12 वीचे शिक्षण घेत वयाच्या २० व्या वर्षात २०२१ मध्ये नौदल भारतीय सैनिक ची परीक्षा दिली व तो मोठया प्रमाणात मार्क घेऊन उत्तीर्ण झाला असल्याने आसाम येथे गत सहा महिने प्रक्षिशन घेतले व मंगळवारी रोजी भर पावसात त्याचे वरवट बकाल ते एकलारा येथे देशभक्ती गीते च्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी करत सैनिक आशिष गाडगे याचे ओक्षण करत मिरवणूक काढण्यात आली सर्व जाती धर्माच्या सह राजकीय नेते मंडळी व नागरिकांनी मोठया संख्येने त्याचे पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले यावेळी वरवट बकाल नगरीत मोठया प्रमाणावर आनंद मय वातावरण निर्माण झाले होते यावेळी सरपंच प्रतिभा ईगळे,उपसरपंच नंदा रोदळे, पांडुरंग हागे, प्रल्हाद अस्वार,सुभाष हागे,मोहन रोदळे,पोलीस कर्मचारी प्रमोद मुळे, प्रा देवानंद दामधर, गणेश करोडे,कडू ससाणे,दगळुराम टाकळकर,यांच्या सह आदी मोठया संख्येने नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते