खामगांव मधे ५ परीक्षा केंद्र
खामगांव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा रविवार ९ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. पंरतू राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सदर परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली होती. ९ एप्रिल रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढेकलण्यात आली होती.
राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने अराजपत्रित संयुक्त पुर्व परीक्षेला परवानगी दिली आहे. यानुसार आता सुधारीत प्रसिद्धीपत्रक काढून लोकसेवा आयोगाची अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रक जारी करत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला होणार असल्याची माहिती दिली आहे. या परीक्षेकरिता जिल्ह्यात एकूण ३१ परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्यामधील पाच परीक्षा केंद्र हे खामगाव मध्ये दिले असून यामध्ये गो. से. महाविद्यालय, अंजुमन हायस्कूल, जे. व्ही. मेहता हायस्कूल, सरोजबेन दामजीभाई विकमसी विद्यापीठ , अरजन खिमजी नॅशनल हायस्कूल अशी ५ परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत.
या परीक्षेकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांना ठळक सुचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या आहे. राज्य सरकारच्या आपवत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल व वन विभाग यांच्याकडून ३ ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या परवानगीनुसार शनिवारी ४ सप्टेंबर २०२१ रोजी अराजपत्रित गट-ब संयुक्त पुर्व परीक्षा २०२० चे आयोजन करण्यात येत आहे. कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीवर शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे. तसेच याबाबतची अधिक माहिती संकेत स्थळावर देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.