बुलडाणा : खामगाव येथील शिक्षक, निवेदक, साहित्यिक अरविंद शिंगाडे यांच्या ‘सूत्रसंचालनाची सूत्रे’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन दि .२ फेब्रुवारी २०२०ला वाशिम येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात अकोल्याच्या सृष्टी बहूद्देशीय संस्थेतर्फे आयोजित चौथ्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनात करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. योगीनी सातारकर-पांडे, उद्घाटक लोककवी डॉ. विठ्ठल वाघ, पूर्वसंमेलनाध्यक्ष किशोर बळी, स्वागताध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षिरसागर, कार्याध्यक्ष नाट्यकर्मी सुरेश नागले, प्रा. डॉ. संतोष हुशे, ज्येष्ठ लेखक नामदेव कांबळे, लक्ष्मीनारायण ग्रुपचे तेजेंद्रसिंह चौहान, प्राचार्य संजय चौधरी, डॉ. विजय काळे, मुक्त पत्रकार नरेंद्र लांजेवार, ज्येष्ठ कादंबरीकार बाबाराव मुसळे, डॉ. रावसाहेब काळे, काव्याग्रहचे विष्णू जोशी, पुरुषोत्तम आवारे, लेखक अरविंद शिंगाडे, संतोष इंगळे, राजू चिमणकर, प्रा. गजानन वाघ, विशालराजे बोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘सूत्रसंचालनाची सूत्रे’ च्या ई-बुकचे प्रकाशन खामगाव येथे २०१९ मध्ये पार पडलेल्या तिसर्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष कादंबरीकार नवनाथ गोरे, उद्घाटक राजकुमार तांगडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले होते. सूत्रसंचालनाची आवड असणाऱ्या सर्वांना मार्गदर्शक ठरतील अशा बाबींचा उहापोह लेखकाने या पुस्तकात केला आहे त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांसह वक्तृत्व कलेसाठी सर्वांना हे पुस्तक दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.