खामगाव:छत्रपती संभाजी महाराज लिखित श्री बुधभूषण या ग्रंथाचे पुनर्लेखन करुन अमरावती जिठल्ह्यातील अजय लेंडे यांनी ३ फुट रुंद व ५ फुट लांबीचे व २४ किलो वजन असा सर्वात मोठा ग्रंथ निर्माण केला आहे.तरी हा ग्रंथ जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा येथे पर्यटकांना व शंभूप्रेमींना पाहण्यास कायम ठेवण्यात येत आहे. हा ग्रंथ अमरावती येथून सिंदखेड राजा येथे येत आहे.परंतु ग्रामीण भागातील व तालुक्यातील तरुणांकडून हा ग्रंथ जातांना आम्हाला पाहण्यास उपलब्ध करुन दयावा अशी मागणी आल्यामुळे हा ग्रंथ ६ जुन अमरावती येथून सिंदखेड राजा पर्यंत रथ यात्रेच्या स्वरुपात जाणार आहे व रथ यात्रा तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमार्गावरुन मिरवणुकीच्या स्वरुपात राहील.
श्री बुधभुषण ग्रंथ रथ यात्रा हि दि.६.जुन २०२२ रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अमरावती येथून सकाळी ८ वाजता प्रस्थान करुन चांदुर बाजार सकाळी १० वाजता मुख्य मार्गावरुन मिरवणुक, परतवाडा दुपारी १२ वाजता मुख्यमार्गावरुन मिरवणुक,अंजनगाव सुर्जी संध्याकाळी ८ वाजता रात्रीचा मुक्काम राहील, दि. ७ जुन २०२२रोजी दर्यापूर सकाळी ९ वाजता मुख्यमार्गावरुन मिरवणूक,मुर्तिजापूर दुपारी १ वाजता मुख्यमार्गावरुन मिरवणूक, अकोला सायंकाळी ६ वाजता मुख्यमार्गावर मिरवणूक रात्रीचा मुक्काम अकोला राहील. दि. ८ जुन २०२२ रोजी खामगाव सकाळी १० वजता मुख्यमार्गावरुन मिरवणूक, बुलडाणा दुपारी १२ वाजता मुख्यमार्गाने मिरवणुक, चिखली सायंकाळी ६ वाजता मुख्यमार्गावरुन मिरवणूक व रात्रीचा मुक्काम. दि. ९ जुन २०२२ रोजी देऊळगाव मही सकाळी ८ वाजता, देऊळगाव राजा सकाळी ९.३० सिंदखेड राजा येथे राजे लखोजी जाधव यांच्या राजवाडा येथून जिजाऊ सृष्टी पर्यंत मिरवणूक निघून ग्रंथ रथ यात्रेचा समारोप करण्यात कार्यक्रम राहील.खामगाव येथे दि. ८ जुन २०२२ रोजी सकाळी १० वाजता अकोला येथून ग्रंथ रथयात्रा बाळापूर नाका येथे आगमन येथून बाळापूर नाका ते कारंजा चौक, कारंजा चौक ते कॉटन मार्केट, कॉटन मार्केट ते देशोन्नती टॉवर, देशोन्नती टॉवर ते फरशी, फरशी ते एकबोटे चौक, एक बोटे चौक ते टॉवर, टॉवर ते जलंब नाका, जलंब नाका ते सिव्हील लाईन मार्गे गांधी बगीचा , गांधी बगीचा ते गजानन टॉकीज मार्गे देशोन्नती टॉवर, देशोन्नती टॉवर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते विजया लक्ष्मी पेट्रोल पंप मार्गे ग्रंथ रथयात्रा बुलडाणाकडे प्रस्थान करेल.तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ग्रंथ रथ यात्रेचे उत्स्फुर्तपणे स्वागत करुन उपस्थित राहावे.