अमरावती : अमरावती जिल्ह्यात १३८ गावांमध्ये पाणीटंचाई असल्याचं भयाण चित्र आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी १८ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे. पाणी टंचाई निवारण्यासाठी ५३ विधन विहिरी तर ९० खाजगी अश्या १४३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तर मेळघाटातील विहीरी पूर्णपणे आटल्या असल्याने एका ठिकाणी असलेल्या विहीरवरून मोठ्या प्रमाणावर महिला व शाळकरी मुलांना दूरववरून पाणी आणावे लागते, त्यातच अमरावतीत उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे, या उन्हात जणू पाण्यासाठी संघर्षच करावा लागतो आहे डोंगर चढून दऱ्या खोऱ्यातून पिण्याचं पाणी आणावं लागतं, मात्र मेळघाट मध्ये पाणी टंचाई काही नवीन नाही त्यांच्या नशिबी पिढ्यानपिढ्या पाणी टंचाई माथी आहे.
अमरावती जिल्हात तापमान४६वर गेलं आहे यावर्षी तापमानाने उच्चांक गाठलंय.. मात्र भर उन्हात महिलांना पाणी टंचाईसाठी संघर्ष करावा लागतो आहे,सध्या विहीर व नळावर मोठ्या प्रमाणावर पाणी भरण्यासाठी झुंबड उडते आहे त्यामुळे या ठिकाणी फिजिकल डिस्टनसिंगचा ही फज्जा उडतो आहे.