बुलढाणा:अमरावती जिल्ह्यात आज रात्री झालेल्या अपघातात तिघे जण ठार झाले असून मृतकात बुलढाण्यातील दोघा युवकांचा समावेश आहे. यात किमान दोन जण जखमी झाले असून चारचाकी वाहनाची मोडतोड झाली आहे.प्राथमिक माहितीनुसार बुलढाण्यातील पवन देशमुख यांचे आज संध्याकाळी अमरावती येथे लग्न होते. या लग्नासाठी त्यांचे वर्गमित्र स्विफ्ट डिझायर गाडीने अमरावती कडे निघाले असता दर्यापूर जवळ एक दुचाकीस्वार व स्विफ्ट डिझायरची धडकली.यात तिघेजण जागीच दगावले.यामध्ये दुचाकी वरील सचिन दुधांडे( लासुरा)याचेसह बुलढाणा येथिल भीषण अपघातात स्विफ्ट डिझायर मधील प्रफुल्ल गावंडे 27 व प्रतीक राऊत 25( दोन्ही राहणार बुलढाणा)हे जागीच ठार झाले इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना अकोला येथे उपचारासाठी भरती करण्यात आल्याचे समजते
previous post