January 7, 2025
मनोरंजन

अभिमानास्पद! सचिन तेंडुलकरने जिंकला क्रीडा विश्वातला ऑस्कर…

बर्लिनमध्ये पुरस्कार सोहळ्याचं वितरण पार पडलं


२०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीनं कुलसेखराच्या गोलंदाजीवर षटकार लगावत भारताला जगतजेता बनवलं. भारताला पुन्हा एकदा जगजेतेपद मिळवून देण्याचं सचिन तेंडुलकरचं स्वप्न साकार झालं होतं. २ एप्रिल २०११ रोजी विश्वचषक विजयानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यांवर उचलून घेऊन संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली होती. यादरम्यान सचिन आपल्या चाहत्यांना अभिवादन करत होता. त्यावेळी टिपलेल्या क्षणाला 2000-2020 या कालावधील क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्या क्षणाला ‘ कॅरीड आन द शोल्डर्स आफ ए नेशन’ शीर्षक देण्यात आलं आहे

क्रीडा विश्वातील ऑस्कर म्हणून ओळख असलेल्या लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सचिनच्या त्या क्षणाला सन्मानित करण्यात आलं आहे. 2000-2020 या २० वर्षांमध्ये क्रीडा विश्वाताला हा सर्वात भावूक आणि प्रेरणा देणारा क्षण होता. सोमवारी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये लॉरियस पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. सचिन तेंडुलकरनं स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून लॉरियस पुरस्कार स्वीकारला.

महत्वाचं म्हणजे या पुरस्कारासाठी विजेत्याची निवड सर्वसामान्य जनतेतून केली होती. यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या पुरस्कारासाठी सचिन तेंडुलकरसह जगभरातील २० दावेदारांना नामांकन होतं. त्या सर्वांना मागे टाकत सचिनने हा बहुमान आपल्या नावे केला आहे. बर्लिनमध्ये टेनिस दिग्गज बोरिस बेकरने सचिनला या चषक देऊन सन्मानित केलं.

Related posts

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमीत्त भव्य राज्यस्तरीय रक्तदान शिबीर

nirbhid swarajya

उद्या होणार जेष्ठगौरी आवाहन

nirbhid swarajya

‘सूर्यपुत्रा’ची कथा मोठ्या पडद्यावर

nirbhid swarajya
error: Content is protected !!