सिद्धार्थ शुक्ला ला 50 लाख रुपयाचं पारितोषिक आणि एक कारही मिळाली आहे.गेल्या चार महिन्यापासून हा सीझन सुरू होता. या वादग्रस्त शोमध्ये सिद्धार्थ शुक्ला, शहनाज गिल, रश्मी देसाई, आरती सिंह आणि पारस छाब्रा हे सहा लोक अंतिम फेरीत होते. ग्रँड फिनाले मध्ये सर्वांत आधी पारस छाब्रा बाहेर गेला. त्याने दहा लाख रुपये घेऊन विजेतेपदाच्या शर्यतीतून स्वत:ला वगळलं.त्यानंतर जनतेने दिलेल्या मतांनुसार आरती सिंह, रश्मी देसाई, शहनाज गिल या शर्यतीतून बाहेर गेले. अंतिम फेरीत सगळ्यात चर्चित जोडी सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाज ही होती.या दोघांची मैत्री आणि त्यानंतर पराकोटीचं शत्रुत्वामुळे ही जोडी बरीच चर्चेत होती. या शोदरम्यान दोघांची तुंबळ हाणामारी झाली होती. मात्र या सगळ्यांवर शेवटी सिद्धार्थ शुक्लाने मात केली आणि शो जिंकला.
previous post