April 11, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा मनोरंजन महाराष्ट्र मुंबई संग्रामपूर

अभयारण्यात पर्यटकांना झाले वाघाचे दर्शन

सातपुड्याच्या पायथ्याशी आहे अंबाबरवा

संग्रामपुर : तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या अंबाबरवा अभयारण्यामध्ये जंगल सफारी करण्यासाठी आलेल्या खामगाव येथील पर्यटकांना दिनांक १९ मार्च रोजी सायंकाळ सुमारास अभयारण्यामध्ये जंगल सफारी करत असताना चक्क वाघाचे दर्शन झाले. खामगाव येथून आलेल्या या पर्यटकांमध्ये आपण अंबाबरवा अभयारण्य मध्ये येऊन जंगल सफारीसाठी आज वाघाचे दर्शन झाल्यामुळे ते अत्यंत आनंदित होते त्यांच्यासोबत गाईड म्हणून वसाळी येथील सुमित पालकर हे होते या अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी आहेत त्यामध्ये अस्वल, वाघ, बिबट, हरण ,रानम्हशी, नीलगाय असे अनेक प्राणी आहेत त्यात सदर जनगणनेमध्ये याची पूर्णता माहिती असते आज वाघोबाचे दर्शन झाल्यामुळे हि बातमी पंचक्रोशी मध्ये वार्‍यासारखी पसरली. अंबाबरवा अभयारण्य मध्ये जंगल सफारी साठी पर्यटक दररोज येत असतात वसाळी येथे शासनाने इको सायन्स पार्क तयार करण्यात आले आहे त्यामध्ये पर्यटकांना राहण्याची जेवणाची अल्प दरामध्ये सोय करण्यात आलेली आहे तसेच या पार्क मध्ये कुत्रिम प्राण्यांचे पुतळे निर्माण करण्यात आलेले आहे सोबतच लहान मुलांना खेळण्यासाठी खेडणे सुद्धा या पार्क मध्ये लावण्यात आलेले आहे भव्य दिव्य असा मुख्य मार्गवरती इको सायन्स पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सुद्धा बसवण्यात आलेला आहे या सर्व बाबींमुळे अनेक पर्यटक वासाळी येथील इको सायन्स पार्क तसेच अंबाबरवा अभयारण्य मध्ये जंगल सफारी करण्यासाठी येत असतात.

Related posts

लॉकडाऊन मध्ये जुगारावर पोलिसांचा छापा

nirbhid swarajya

अबब..एका गावात निघाले १३२ साप

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त ३३ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’;तर ०३ पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!