November 20, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी नांदुरा बुलडाणा

अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने पकडला गुटखा, शस्त्र व दारू

खामगाव : अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने नांदुरा तालुक्यातील तिकोड़ी येथे देशी विदेशी दारू, शस्त्र व गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपर पोलिस अधीक्षक यांच्या पथकाला गुप्त बातमी दाराकडून खबर मिळाली की नांदुरा तालुक्यातील ग्राम तिकोडी येथे एक व्यक्ती अवैधरित्या विनापरवाना शस्त्र तसेच देशी-विदेशी दारू व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बाळगत असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने ग्राम तिकोडी येथे असणा-या राजू बडे यांच्या जगदंबा किराणा दुकान व घरामध्ये धाड टाकली असता त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तसेच मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा किंमत २३ हजार ७६० रुपये,देशी विदेशी दारू किंमत १३ हजार १९० रुपये तसेच तीन तलवारी व एक मोठा चाकू किंमत ६००० रुपये व नगदी २५३० रुपये असा एकूण ४५ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी आरोपी राजू बडे याच्याविरुद्ध नांदुरा पोलिस स्टेशन येथे कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सपकाळे, पोहेकॉ गजानन बोरसे, रघुनाथ जाधव, गजानन आहेर, संदीप टाकसाळ, राम धामोडे अनिता गायके, निर्गुणा सोनटक्के यांनी केली आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 410 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 36 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

पुन्हा ३ रुग्णांनी जिंकले युद्ध

nirbhid swarajya

बोरी अडगांव येथे उद्या श्री अखंड शिवलिंग महाअभिषेक सोहळ्याची सांगता…

nirbhid swarajya
error: Content is protected !!