खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात मध्यप्रदेश येथून नेहमीच गुटख्याची तस्करी केली जाते.पाेलिसांनी किती प्रयत्न केले तरी त्यात दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान पाेलिसांनी नुकताच एक ट्रक पकडून २५ लाख रुपयांच्या गुटख्या व टाटा आयशर वाहन क्रमांक एम एच ०४ इबी ९८७२ असा एकूण ४०,९५,२००रु मुद्दे माल जप्त करून तिघांना ताब्यात घेतलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार अपर पोलीस अधीक्षक दत्त यांच्या पथकाला गुटखा वाहतूक करणारा ट्रक येणार असल्याची माहिती गुप्त माहितीच्या आधारे मिळाली हाेती. पाेलिसांनी संबंधित ट्रक येताच त्याचा पाठलाग केला आणि ट्रक पकडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हा ट्रक मध्यप्रदेश येथून आला हाेता.या कारवाईत २५ लाख रुपये किमतीचा गुटखा, वाहन असा एकूण ४०,९५,२०० रु चा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.तसेच या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चाैकशी सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.आरोपी अजय लीलाधर गोसावी, साग़र यशवंत औतार दोन्ही रा. जळगाव खान्देश,गजानन मापारी रा. लोणार याचे विरुद्ध पो स्टे मेहकर यांच्या विरुद्ध मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तासप सुरू आह.सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक सा बुलढाना यांचे मार्गदर्शनाखाली मा अपर पोलीस अधीक्षक सा खामगांव पदभार अपोअसा बुलढाना यांचे अदेशाने पोउपनी पंकज सपकाळे,पो हे का गजानन बोरसे,ना पो का गजानन आहेर,ना पो का संदिप टकसाळ,पो का राम धामोड़े यांनी केली