४ लक्ष रूपयांचा धनादेश प्रदान
शेगाव 🙁कृष्णा पाटील )कधी कुणावर कशी वेळ येईल ते सांगता येत नाही, मनुष्य संकटात असला की, केवळ सांत्वन केल्या जाते प्रत्यक्ष मदत कुणीही करत नाही. मात्र श्री यादव बेकर्सचे संचालक माजी नगरसेवक विजय यादव हे त्याला अपवाद ठरतात. नुकतेच त्यांनी त्यांच्या बेकरीमध्ये कर्मचारी असलेल्या स्व.राजू सावेकर यांच्या कुटुंबीयांना ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून ४ लक्ष रूपयांची आर्थिक मदत मिळवून दिली. त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करित असलेल्या स्व.राजू सावेकर कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
श्री यादव बेकर्स मध्ये कर्मचारी असताना राजू सावेकर यांचे अपघातात निधन झाले होते. त्यावेळी यादव बेकर्स प्रशासनाकडून त्यांचा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत विमा काढलेला असल्याने त्या माध्यातून त्यांच्या कुटुंबीयांना २४ मार्च रोजी कंपनीकडून ४ लक्ष रूपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात आले. यादव बेकर्सचे संचालक विजय यादव हे त्यांच्या फर्ममध्ये काम करणार्या कर्मचार्यांची घरच्या सदस्यासारखी काळजी घेतात. त्यामुळे त्यांच्याकडे काम करणार्या कर्मचार्यावर कसलेही संकट आले तर त्याला यादव बेकर्स प्रशासनाकडून यथोचित मदत केली जाते. विशेष म्हणजे, यादव बेकर्सच्या सर्व कर्मचार्यांना ओरिएंटल कंपनीचे विमा कवच आहे.स्व.राजू सावेकर यांच्या निधनानंतर त्यांना आकस्मिक निधन झाल्याबद्दल विम्याचे पैसे मिळावेत याकरिता मा.नगरसेवक विजय यादव यांचेसह ओरिएंटल कंपनीचे विभागीय व्यवस्थापक सचिन पडोळे, विमा प्रतिनिधी प्रकाश कलतारी, भागवत मधुकर धोटे आदींनी सततचा पाठपुरावा केला. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला कळू न देण्याची मानसिकता विजय यादव मित्र परिवाराची सर्वश्रुत आहे. मात्र त्यांचे हे कर्तुत्व इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते करिता प्रसिध्दीचा उहापोह.केला असल्याचे त्यांनी सांगितले