खामगाव :-संग्रामपुर तालुक्यातील बावनबिर रेस्टहाऊस जवळ पुलाच्या खाली पडून दुचाकीस्वार पोलीस कर्मचारी संतोष राजपूत यांच्या अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुलाचे बांधकाम सुरू आहे मात्र त्या ठिकाणी कुठले सूचनाफलक नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर येत आहे.बांधकाम विभागाचा भोंगळ कारभारामुळे पुलाच्या काम पुर्ण नं झाल्यामुळे अपघात झाला असल्याचा आरोप नागरिक करित आहे.
पुलाचं बांधकाम सुरू असल्याने त्या ठिकाणी कोणताच फलक नसल्याने हा अपघात घडला.बावनबिर ते सोनाळा रोडवरील दत्तू शेठ आकोटकार यांच्या शेतासमोरील नवीन पुलाचा सुरू असून त्या पुलामध्ये तामगाव पोलीस स्टेशन मधील कार्यरत पो. हे.कॉ.संतोष राजपूत यांचा अपघात झाला ते गाडी सह पुलाच्या पाण्यात पडल्याने त्यांच्या जागी मृत्यू झाला आहे संतोष राजपूत हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांच्या अपघाती मृत्यूने पोलीस विभागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोहे का संतोष राजपूत यांना निर्भिड स्वराज्य परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली