November 20, 2025
चिखली

अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू ; पत्नी जखमी

चिखली – खामगांव मार्गावरील अपघात 

चिखली : चिखली ते खामगांव मार्गावर दहिगाव फाट्याजवळ मंगळवारी एका भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन जण ठार झालेत. पत्नी आणि मुलाला घेऊन बाईकवरून उन्द्री गावाकडे निघालेले अंबादास रिंढे जागीच गतप्राण झाले. त्यांचा ८ वर्षीय मुलगाही अपघातात मरण पावला आहे. तर त्यांच्या पत्नीला जखमी अवस्थेत चिखली येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी आणले असता त्यांना औरंगाबाद साठी हलविण्यात आले आहे. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेली ब्रिझा कार जप्त केली आहे. अंबादास रिंढे हे उन्द्री येथील सहकार विद्या मंदिर शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच ते कॉम्प्युटर क्लासेस सुद्धा घेत होते, या अपघातामुळे शेलसुरमध्ये दुःख पसरले आहे.

Related posts

जनतेचा आग्रह असल्यास लोकसभा लढवणार – संदीप शेळके

nirbhid swarajya

खामगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचासह सदस्य निवडणूक

nirbhid swarajya

देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही आधाराची गरज..

nirbhid swarajya
error: Content is protected !!