November 20, 2025
आरोग्य क्रीडा खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा

अन् ओसाड भिंती झाल्या बोलक्या….!

खामगांव : नगर परिषदेकडून शहरात आगळावेगळा प्रयोग राबवून शहरातील पोलीस स्टेशनच्या, गांधी बगीचासह शहरातील विविध भागातील ओसाड भिंतींवर सामाजिक व कोरोना बाबत संदेश देत चित्रे रेखाटण्याचे काम सुरु आहे.वाहने चालवण्याबाबत तसेच पर्यावरणाचे रक्षण करा, पाण्याचे मोल अनमोल, वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धनाची गरज असा सामाजिक संदेश देत समाजप्रबोधन केले जात आहे. तसेच कोरोनाबाबत संदेश देत आगळावेगळा प्रयोग
शहरातील पोलीस स्टेशन व गांधी बगीचाच्या ओसाड भिंती बोलक्या करीत आगळावेगळा प्रयोग राबविल्याने कौतुक होत आहे. मंगळवारी सकाळपासून आकर्षक चित्र रेखाटण्याचे काम सुरु होते. दुपार पर्यंत सर्व भिंती आकर्षक दिसत होत्या. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागिरकांचे लक्ष वेधल्या जात आहे. त्यामुळे शहरातील बोलक्या भिंती आकर्षण ठरत आहेत.

Related posts

बहिरेपणा टाळता येतो का…?

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 402कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 70 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

क्वारंटाईन केलेल्या नागरीकांवरच उपासमारीची पाळी

nirbhid swarajya
error: Content is protected !!