खामगाव:येथील नगर परिषद कार्यालयाजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.काल रात्री १० वाजेदरम्यान न.प. कर्मचाऱ्यांना रस्त्यावर एक अनोळखी इसम पडलेला दिसून आला.त्यांनी लगेच त्याला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात नेलेअसता यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले .याप्रकरणी शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला असून मृतकाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.सदर मृतक हा अंदाजे ४५ वर्षाचा असून डोक्यावर काळे – पांढरे केस , निळ्या रंगाचे मळकट शर्ट , काळ्या रंगाची फुलपॅन्ट , गळ्यात तुळशीमाळ , निमगोरा रंग , उंची ५ फुट ५ इंच असे वर्णन असून अशा वर्णनाच्या व्यक्तीची माहिती असलेल्यांनी खामगाव शहर पोस्टेला संपर्क करावा , असे आवाहन करण्यात आले आहे .
previous post