January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ

अनलाॅक 5 मध्ये राज्या अंतर्गत व राज्या बाहेरील काही रेल्वे सुरू करण्यास परवानगी

15 ऑक्टोबरपासून आरक्षण सुविधा उपलब्ध

खामगांव : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवा थोड्याफार प्रमाणात रुळावर येत आहे.अनलाॅक ५ मध्ये राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार रेल्वे खात्याने दसरा-दिवाळी सणासाठी येत्या २० ऑक्टोबरपासून रेल्वे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यात मुंबई-अमरावती नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस मुंबई नागपूर विदर्भ एक्सप्रेस तसेच पुणे नागपूर गरीब रथ या विदर्भातील प्रवाशांसाठी उपयाेगी ठरणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांसाठी १५ ऑक्टोबरपासून आरक्षण करता येईल.

ह्या होणार राज्यांतर्गत या गाड्या सुरू….

मुंबई-पुणे (डेक्कन एक्स्प्रेस), मुंबई-पुणे (इंटर सिटी), मुंबई-पुणे (सिंहगड), मुंबई-पुणे (प्रगती एक्स्प्रेस), मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड तपाेवन एक्स्प्रेस, पुणे-नांदेड सुपरफास्ट एक्स्प्रेस, मुंबई-लातूर, मुंबई-सोलापूर (सिद्धेश्वर एक्स्प्रेस), पुणे-सोलापूर (हुतात्मा एक्स्प्रेस), पुणे-नागपूर सुपर फास्ट, पुणे-भुसावळ एक्सप्रेस आहे.इतर गाड्यांमध्ये पुणे येथून धावणाऱ्या झेलम आणि दरभंगा एक्स्प्रेसही सुरू होणार असून मुंबई हून पंजाब, मंगलोर आणि कराईकल एक्स्प्रेसही २० ऑक्टोबरपासून सुरू होतील.अशी माहिती रेल्वे प्रशासनाने एका पत्राद्वारे दिली आहे.

Related posts

बुलढाणा जिल्हा प्रशासनाचा माजीमंत्री तथा आ.डॉ. संजय कुटे यांच्याकडून निषेध

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 32 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 03 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

बुलडाण्यात महिला पोलिस कर्मचारीचे प्रायव्हेट फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

nirbhid swarajya
error: Content is protected !!