अवैद्य नळ कनेक्शन ला जबाबदार कोण ?
शेगांव: जलंब ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार चहाट्यावर अनधिकृत नळ कनेक्शनचे जलंब गावात उत अनाधिकृत नळ ग्रामपंचायतने शोधने गरजेचे.अनधिकृत नळ कनेक्शन मुळे नागरीकांना पाणीपुरवठा गरजे पेक्षा कमी प्रमाणात होत आहे.या अनधिकृत नळ कनेक्शन शोधून काढले तर यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.जलंब ग्रामपंचायत हद्दीतील अवैध नळ कनेक्शन च्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सरपंच सौ घोपे तर सचिव काळे हे काही उपाय योजना राबविण्यात येतील का,अवैध नळ कनेक्शन बाबत पाणीपुरवठा कर्मचारी वर्ग हे सुद्धा तेव्हढीच जवाबदार आहेत.याशिवाय जलंब गावातील काही प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायतीला हाताशी धरून अवैद्य नळ कनेक्शन घेताना दिसून आले.हा प्रकार नेमका काय? ग्रामपंचायतणे जलवहिनीवरील नळांची तपासणी करून अनधिकृत नळ कनेक्शन शोधणे,असे नळ कनेक्शन खंडित करून पाणी चोरी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करणे,अशी अनधिकृत नळ जोडणी करणारे नागरिक यांच्यावर गुन्हे दाखल करणे,नवीन अनधिकृत नळ जोडण्या होणार नाहीत याची दक्षता घेणे व नियोजन करणे ही जबाबदारी ग्रामपंचायतची आहे.असे प्रकार शेगांव पंचायत समितीच्या प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये असतील यात काडी मात्र शंका नाही.वरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा लक्ष देणे गरजेचे झाले आहे.