खामगाव : बुलढाणा जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत असून, यामध्ये १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बारा अधिकारी, कर्मचारी यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी खामगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महसूल विभाग अंतर्गत जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेच्या आधी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे महसूल प्रकरणाचे निपटारे तसेच गौर खनिज उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करुन सातबारा संगणकीकृत करणे यासह इतरही कामांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या महसूल सप्ताह निमित्त सन्मान करण्यात येतो.यावेळी जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या हस्ते बुलढाणा येथे खामगाव महसूल विभागातील तहसीलदार अतुल पाटोळे आडगाव मंडळ अधिकारी कैलास वरगट अव्हल कारकून व्ही.आर निसंग यांचा प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या हस्ते खामगाव तहसीलदार अतुल पाटोळे यांचा सत्कार करण्यात आला.
अमरावती खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ विविध लेख शिक्षण शेगांव शेतकरी सामाजिक