April 11, 2025
खामगाव जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बुलडाणा मलकापूर विदर्भ शेगांव शेतकरी संग्रामपूर

अतीरुष्टि मुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचे शेतकऱ्यांच्या बाधावर जाऊन पंचनामे करा स्वाभिमीनीची मागणी.

शेगाव :- या खरीप मध्ये पाऊस चांगला असल्याचे हवामान खातेने दिलेल्या अंदाजा नुसार शेतकऱ्यांनी या वेळेस मिरगाची पेरणी केली व पहिल्याच पावसात शेती पेरायाला सुरवात केली. परंतु पाहिजे तसा पाऊस न झाल्याने दुबार-तिबार पेरणीने संकट शेतकऱ्यांन वर आले.परंतु नंतर महाराष्ट्र भरात पावसाने जो थेमान घेतला त्यात शेगाव तालुका ही सुटला नसल्याने परिणामी चागलाच पाऊस या ठिकाणी झाला आहे व त्या मुळे शेतकऱ्यांची बरीसशी शेती प्रभावीत झाली असून. शेती लागत च्या गावामध्ये ही मोठया प्रमाणात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे.घरात पाणी शिरलायाने अन्नधान्य समेत संसार उपयोगी साहित्य ही या पाण्यात भाजून गेले असलेल्याने शेतकरी, शेतमजूर नागरिक हतभल झाला आहे. त्याच बरोबर अतिवृष्टी शेतकऱ्यांची शेती जमीन खरडून गेल्याने शेतकरी शासनाकडे अशेच्या नजरेने पाहत आहे. आदीच सुलतानी कचाट्यात अळकलेला शेतकरी आसमानी कहरा मुळे हवालदिल झाला आहे. अतिरुष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे नुस्ते कागदावरील पंचनामे न करता शेतकऱ्यांच्या बांधावर जाववून पंचनामे करावे तेव्हाच त्यांच्या नुकसानाचे प्रमाण कळेल आणि शेतकऱ्यांना शासन स्तरावर आर्थिक मदत मिळेल अश्या तऱ्हेचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर तालुका अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कडून देण्यात आले असून शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे शासनाच्या कडून भरीव मदत मिळावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून शेतकऱ्यांच्या न्याय हक्का करिता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.

Related posts

कोविड लसीकरणाच्या तयारीसाठी ‘रंगीत तालीम’

nirbhid swarajya

बुलढाणा येथील माजी आमदार विजयराज शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश

nirbhid swarajya

जिल्ह्यात प्राप्त 302 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 64 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!