शेगांव: तालुक्यात ६ सप्टेंबर पासून १६ सप्टेंबर पर्यंत शेगाव तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेता मधील सोयाबीन तूर कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले. राज्य शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गायगाव बु व गायगाव खुर्द तसेच कणारखेड येथील शेतकरी बांधवांनी तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे केली आहे १६ सप्टेंबर रोजी गायगाव बु गायगाव खुर्द आणि कनारखेड येथील शेतकरी बांधवांच्या वतीने शेगाव येथील तहसीलदार समाधान सोनवणे यांना तहसील कार्यालय शेगाव येथे निवेदन देण्यातआले. या निवेदनावर योग्य ती तत्काळ कारवाई नाही झाली तर गायगाव बु गायगाव खुर्द आणि कनारखेड येथील सर्व शेतकरी बांधव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
अमरावती खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर विदर्भ शेगांव शेतकरी संग्रामपूर