जळगाव जामोद संग्रामपूर,शेगाव तालुक्यामध्ये दिनांक १७ जुलै ते १९ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.यामध्ये प्रामुख्याने जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी व जळगाव जामोद महसूल मंडळ,संग्रामपूर तालुक्यातील कवठळ,पातूर्डा व संग्रामपूर महसूल मंडळ तथा शेगाव तालुक्यातील मनसगाव,जवळा व शेगाव महसूल मंडळा मध्ये कृषी विभागाच्या अहवाला नुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास येते परंतु वास्तविक या तिन्ही तालुक्यातील सर्व भागात पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.तरी आपण व्यक्तिशः लक्ष देऊन राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई व ओला दुष्काळ जाहीर होण्यासाठी प्रयन्त करावे असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत दादा पाटील यांनी दिनांक २९ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार विदर्भाच्या दौऱ्यावर असतांना वर्धा येथे प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केली.
