जळगाव जा : संग्रामपुर तालुक्यातील हिगंणा,जस्तगाव,पातुर्डा,वानखेड,दुर्गादैत,मनार्डि, उकळगाव,वरवट,एकलारा,बावनबीर,काकणवाडा, सावळी,सह ईतर गावात २७ जुन रोजी सकाळी अतिवृष्टी झालेल्या शिवारात स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर व कृषी विभागाची टीम यांनी शेतात जाऊन पिक नुकसानिची पाहणी केली. शेतक-यांच्या शेतातील सोयाबिन,कपाशी,मका, ज्वारी,तुर,उडिद,मुंग असे सर्व पिके उध्दवस्त झाले आहेत. या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन शेतक-यांना भरीव नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी आज केली आहे. आर्थिक दृष्ट्या शेतकरी पुर्णपने खचेल असंताना ही निसर्गाची अवकृपा शेतक-यांना मारक ठरलेली आहे. एकतर चार वर्षाचा दुष्काळ व मागील वर्षीचा ओला दुष्काळाने शेतकरी हवालदिल झालेला आहे. या वर्षी पेरणी करुनही कंपन्यांचे सोयाबिनचे बोगस बियाणे निघाल्याने अनेक शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातच २७ जुन रोजी अतिवृष्टी झाल्याने शेतक-यांच्या शेकडो एकर जमीनी खरडुन गेल्या व न भरुण निघनारी पिकांची हानी झाली. त्यामुळे पुन्हा अक्षरशा शेतक-यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागात बहुतांष शेतक-यांना तिबार पेरणी कराव्या लागतात. हे शेतक-यांन समोर मोठे संकटच आले आहे. अतिवृष्टी झालेल्या शेतक-यांच्या शिवारात पाहणी करतांना. खरडुन गेलेल्या जमिनीचा व पिकांची नुकसान भरपाई म्हणुन शेतक-यांना लवकरच शासनाकडुन भरीव मदत मिळवुन देऊ अशी ग्वाही पिक पाहणी करतांना स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी शेतक-यांना दिली आहे.
previous post
next post