December 29, 2024
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ शेतकरी

अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी -आ.ॲड आकाश फुंडकर

खामगांव : राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे हे आज जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असता खामगांव विधानसभा मतदार संघाचे आ.ॲड.आकाश फुंडकर यांनी भेट घेऊन जिल्हयातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली. यासोबतच लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचे मागील वर्षीचे अनुदान थकीत असून ते देखील तात्काळ देण्यात यावे अशी मागणी त्यांनी पत्राव्दारे केली आहे.
जिल्हयात गेल्या महिन्यात मोठया प्रमाणत अतिवृष्टी झाली. यामधे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. ह्या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले. परंतु शासनाने अद्याप पर्यंत कोणतीही मदत जाहीर केली नाही. यासोबतच राज्यभरातील शेतकऱ्यांचे लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबीत आहे. शेतकऱ्यांना फळबाग लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी ही एक चांगली योजना सुरु करण्यात आली होती. सदर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान देण्यात येते. परंतु हया योजनेंतर्गत हजारो शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे एका चांगल्या योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित आहे.
यासोबतच राज्यभरात एकात्मिक फलोत्पादन योजनेंतर्गत कृषी विभागाला अद्याप लक्षांक देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी साहित्य, अवजारे, कांदाचाळ इत्यादी खरेदी करण्यात अडचण निर्माण होत आहे. हया योजनेंतर्गत कोणत्याही प्रकारचा लक्षांक देण्यात आला नसल्यामुळे कृषी विभाग शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारत नसून त्यामुळे शेतक-याला नवीन अद्यावत शेती करण्यास अडचणी निर्माण होत आहे. यासोबतच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत लाभार्थी शेतक-यांनी व अल्पभूधारक,भूमिहीन शेतक-यांनी अर्ज केले परंतु त्या सर्वांना कोणत्याही प्रकारची पुर्वसंमती देण्याचे आदेश शासनाने निर्गमीत केले नसल्यामुळे सर्व अर्ज प्रलंबीत आहेत. त्यामुळे शेतक-यांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्य सरकारने (पोकरा) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पुर्वसंमती देण्याचे आदेश देण्यात यावे.
खामगांव मतदार संघातील ६ मंडळे ही पिकविमा योजनेतून वगळण्यात आलेली असल्यामुळे २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे नुकसानीची मदत शेतक-यांना मिळाली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहे. सदर नुकसानीचे कृषी विभागाने पंचनामे देखील केले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना तातडीने पिक विम्याचा लाभ देण्यात यावा अशीही मागणी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांना प्रत्यक्ष भेटून पत्राव्दारे केली आहे. हयावर मा मंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवली. हयावर लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

Related posts

गुरू तेग बहादूरांपासूनच बलिदानाच्या परंपरेस सुरूवात: गोविंद शेंडे

nirbhid swarajya

गीतांजली एक्सप्रेस रुळावरून घसरली; सुदैवाने जीवीतहानी नाही

nirbhid swarajya

आ ॲड.आकाश फुंडकर, जिल्हाध्यक्ष भाजपा यांच्या मागणीला यश

nirbhid swarajya
error: Content is protected !!