January 4, 2025
जिल्हा

अडकून पडलेल्या नागरिकांना घरटे जवळ करण्यासाठी एसटी सज्ज

बस मागणीसाठी आगारांशी संपर्क साधावा

बुलडाणा : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षण व अन्य कारणांमुळे राज्याच्या विविध भागात नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. अशा नागरिकांना त्यांचे घरटे जवळ करण्यासाठी एसटी सज्ज झाली आहे.
   प्रवास करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने शासनाने विहीत केलेले प्रवासास अनुमती देण्यात आल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नागरिकांना प्रवासाचे सुरूवातीचे ठिकाण व शेवटचे ठिकाण अशाच प्रवासास परवानगी देण्यात येईल. मार्गातील मधल्या थांब्यावर उतरता येणार नाही. बसच्या मागणी करीता बसचा मार्ग, वेळ, प्रवाशांची संख्या आदीसह बस सोडावयाची आहे त्या ठिकाणच्या संबंधित आगार व्यवस्थापक यांचेकडे मागणी करावी. सदर बसेस या लॉक डाऊन कालावधीपुरतेच मर्यादीत राहतील. बसमध्ये सुरक्षीत अंतर ठेवूनच म्हणजेच एका बाकावर एक प्रवाशी याप्रमाणे एक बसमध्ये २२ प्रवाशांस प्रवास करता येणार आहे. तसेच प्रवाशांनी मास्क घालणे बंधनकारक राहील.
  बसमध्ये प्रवेश करतांना त्यांचेकडील शासनाने प्रवासास परवानगी दिल्याचे प्रमाणपत्र, नागरिकाचे आधारकार्ड अथवा शासनाने जारी केलेले ओळखपत्र आवश्यक राहणार आहे. बस उपलब्ध करून देताना मागणी केलेल्या गावाचे जाण्या येण्याचे अंतर यास रूपये ४४ प्रति किलो मीटर प्रमाणे गुणून येणारी रक्कम यामध्ये रूपये ५० प्रति बस अपघात सहाय्यता निधीची बेरीज करून येणारी रक्कम नगदी स्वरूपात मागणीवेळी जमा करावी लागणार आहे. बसच्या मागणीकरीता संबंधित आगार व्यवस्थापक यांचे कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक हे २४ तास सुरू राहणार आहे.
   बस आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुख यांचे मोबाईल क्रमांक व दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. सदर क्रमांक पुढीलप्रमाणे : आगार बुलडाणा : 07262 242392, आगार व्यवस्थापक  आर. यु मोरे 8208952614 व स्थानक प्रमुख डि. बी साळवे 8087378154, चिखली आगार : 07264 242099, आगार व्यवस्थापक व्ही. एस वाकोडे 9420242097 व स्थानक प्रमुख एस. आर जोगदंडे 9881564020,  खामगांव आगार : 07263 252225, आगार व्यवस्थापक एस.एच पवार 9765940627 व  स्थानक प्रमुख  आर. यु पवार 9763703744, मेहकर आगार : 07268 224544, आगार व्यवस्थापक आर. ए कोळपे 9423745486 व स्थानक प्रमुख एच.ई नागरे 9730842233, मलकापूर आगार : 07267 222165,  आगार व्यवस्थापक डी. के दराडे 9923845605 व स्थानक प्रमुख योगेश वांदे 9890626544, जळगांव जामोद आगार : 07266 221502, आगार व्यवस्थापक स्व. कै. मास्कर 9881962173 व स्थानक प्रमुख एस. डी घुगे 9309734560, शेगांव आगार : 07265 254173, आगार व्यवस्थापक एस. ए भिवटे 8329773384 व स्थानक प्रमुख ए. यु मुसळे 9922496649 आहे. तसेच नियंत्रण कक्ष, विभागीय कार्यालय, बुलडाणा येथील दुरध्वनी क्रमांक 07262 242594 आहे.
  तरी नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून इच्छीत स्थळी जाण्यासाठी बसेसची मागणी करावी, असे आवाहन विभाग नियंत्रक श्री. रायलवार यांनी केले आहे.

सौजन्य: जिमाका 

Related posts

संचारबंदी काळात मासेमारीच्या सर्व कृती करण्यास परवानगी

nirbhid swarajya

खामगांव ASP पथकाची दारू विक्रेत्यांविरोधात धडक मोहीम

nirbhid swarajya

‘मास्क नाही, प्रवेश नाही’ जाणीव जागृती मोहिमेची सुरुवात ; पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडून सुरूवात

nirbhid swarajya
error: Content is protected !!