खामगाव: तालुक्यातील बोरी अडगाव येथुन खामगाव कडे जात असताना २८ नोव्हें रोजी दुपारी १२.३०वाजताच्या सुमारास प्रवाशी घेवुन येत असतांना बोरी गावाजवळ समोरून ऑटो चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ऑटो पलटी झाला. सदर घटनेची माहिती मिळताच बोथाकाजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे १०२ रूग्णवाहीकेचे चालक अमोल सोळंके हे त्वरीत घटनास्थळी पोहोचले होते व जखमींना घेवुन त्वरीत स्थानिक सामान्य रूग्णालयात उपचारार्थ भरती केले. जखमींमध्ये सौ.ज्योति अनिल रहाणे (४०), तुषार अनिल रहाणे (१५) दोघे रा.घाटपुरी, प्रमिला प्रकाश निर्मळ (३३) राज्य रा.विहीगाव, नंदा विश्राम सुरवाडे रा. बोरी अडगाव व ऑटो चालक ताप सै. राजिक या पाच जणांचा समावेश आहे. बोरी अडगाव ते अटाळी रस्ता अरुंद असल्यामुळे या रस्त्यावर नेहमी अपघात होत असतात अशी माहिती एका ग्रामस्थाने दिली.