खामगाव : अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला ही घटना रात्री १० च्या सुमारास अकोला – खामगाव मार्गावरील मोठ्या हनुमान जवळ घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील नागापूर येथील नारायण ज्ञानदेव तिव्हाने वय ४६ हे शेतीचे साहित्य घेण्यासाठी दुचाकीने खामगाव येथे आले होते दरम्यान रात्री काम आटोपून रात्रीच्या सुमारास दुचाकी क्र. एमएच-२८-यु २८४८ ने परत जात असताना खामगाव-अकोला मार्गावरील मोठ्या हनुमान जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिली.
या धडकेत नारायण तिव्हाने यांच्या डोक्याला मार लागुन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ गजानन जोशी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या प्रकरणी रामेश्वर तिव्हाने यांच्या तक्रारी वरून शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध कलम २७९, ३०४(अ), भादवीसह कलम १३४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.