खामगाव : येथून जवळच असलेल्या महामार्ग क्रमांक 6 वरील आसरा माता मंदिराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटनाआज घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महामार्ग क्रमांक 6 वर असलेल्या रावण टेकडी जवळील आसरा माता मंदिराजवळ रामेश्वर तुकाराम खंडारे वय ६० हे रोज नियमित संध्याकाळी ७ वाजता फिरायला जात असताना आज ते फिरायला गेले असता भरगाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली, सदर धडक इतकी जोरदार होती कि या धडकेत त्यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे एपीआय जगदाळे व कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. मृतक हे फेडरेशन मधील निवृत्त कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे.
previous post