शेगांव खामगाव रोड वरील घटना
खामगाव: उंच गतीरोधकावरून दुचाकी आदळल्याने तोल जाऊन एक युवक खाली कोसळला.तितक्यात पाठीमागून आलेले भरधाव अज्ञात वाहन अंगावरून गेल्याने बोरजवळा येथील २२ वर्षीय महेश पवार याचा मृत्यू झाला. आज सोमवारी दुपारी सुमारास ही घटना खामगाव-शेगाव रस्त्यावर घडली. बोरजवळा येथील महेश भगत पवार (२२ रा. बोरजवळा ता. खामगाव हा सोमवारी दुपारी खामगाव येथून शेगावकडे जात असताना दरम्यान, खामगाव-शेगाव रोडवरील एस एस डी व्ही शाळेसमोर असलेल्या गतिरोधकावर त्याची दुचाकी आदळल्याने महेश खाली कोसळला. तितक्यात पाठीमागून येत असलेले अज्ञात मालवाहू वाहन त्याच्या अंगावरून गेले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.