खामगांव : येथील आठवडी बाजारातील होलसेल किराणा दुकान फोडून दुकानातील नगदी व मॉनिटर सीसीटीव्ही कॅमेरासह मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आठवडी बाजार येथील ओमप्रकाश चेलाराम गुरबाणी यांची होलसेल किराणा दुकान असून १५ जून रोजी सायंकाळी ७:०० वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. आज सकाळी दुकान उघडण्यास गुरबाणी गेले असता त्याची होलसेल किराणा दुकानाच्या मागील बाजूने असलेले गोडाऊनचे शटर तोडलेले दिसले.
अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन दुकानातील चिल्लर पैसे व १० रु च्या नोटा असे १० हजार रु., टिव्ही मॉनिटर ,तीन CCTV कॅमेरे, डिव्हीआर सीटी प्लस ,हार्डडिक्स सह किंमती १४ हजार रु., ब्रिस्टॉल २००० ,गोल्ड फ्लँक २०००, कुल १००० ,उंटबिडी ३६००० किंमत ५०००० रु असा एकुन ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी होलसेल विक्रेता ओमप्रकाश चेलाराम गुरबाणी यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम ३८०, ४६१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गजानन जोशी करीत आहे.