बुलडाण्या तील ज्ञानगंगा अभयारण्यासाठी सी-1 वाघ येणे ही बाब महत्वाची ठरली होती.परंतु 15 दिवस ज्ञानगंगेत राहून पुढे अजिंठा पर्वत रांगेत मार्ग काढत हा वाघ अजिंठा लेण्या पर्यंत जाऊन पोहोचला व नंतर वाघोबा ज्ञानगंगा अभयारण्यात परत आलाय.. त्याच्या येण्याने अकोला वन्यजीव विभाग उत्साहित झालेला आहे.मात्र ही भटकंती फक्त मादी वाघासाठी ठरत असल्याचे बोलल्या जात आहे, आणि तीन वर्षे वयाच्या या वाघाने वाघिणीसाठी आता तब्बल 1800 किलोमीटरचा प्रवास केलाय…
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे 205 चौरस.की.मी.वर विस्तारलेला असून या अभयारण्यात 3 वाघांचा अधिवास राहिल एवढी वनसंपदा आहे.यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य ते ज्ञानगंगा अभयारण्य असे 1300 कि.मी.चे अंतर सी-1 वाघाने कापले होते.15 दिवस ज्ञानगंगेत राहून हा वाघ पुढे अजिंठा पर्वत रांगेत टप्पे ओलांडत अजिंठा लेन्या पर्यंत जावून पोहोचला होता अशी नोंद वाइल्डलाइफ इंसिट्यूट कडे आहे.वयात आलेल्या या वाघाची पायपिट वाघिनच्या शोधासाठी सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता बुलडाणा जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमीसाठी पुन्हा एकदा गुड न्यूज असून 4 ते 5 दिवस अगोदरच हा वाघोबा अजिंठा सफारीवरुन परत ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला आहे.
अभयारण्यात आलेल्या 2 पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी सी-1 वाघाने आपले दर्शन दिले आहे.जर हा वाघ ज्ञानगंगेत अजुन काही दिवस थांबला तर त्याच्यासाठी मादीची सोय करण्यासाठी योग्य पाऊल उचलन्यात येणार असल्याचे वन विभाकडून सांगण्यात आले आहे ,महाराष्ट्र व तेलंगाना हे दोन राज्य तर महाराष्ट्र मधील यवतमाळ,नांदेड़,
हिंगोली,वाशिम,अकोला,बुलडाणा, जालना,औरंगाबाद या जिल्ह्यात आता पर्यंत जवळपास एकूण 1800 किलोमीटर फिरणाऱ्या सी-1वाघाने एक नवीन विक्रम कायम केला आहे.
त्यामुळे या वाघोबाच्या वास्तव्यास पोषक वातावरण आणि सुविधा या ज्ञानगंगा मध्ये असून आता एक वाघिणीची व्यवस्था करून सी-1 साठी वन विभागाने करावी आणि काही महिन्यांसाठी का होईना हा वाघोबाचा सलग प्रवास थांबवावा.