दादुलगाव:काल रात्री तालुक्यासह दादुलगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.पावसाने गारद झालेलं हरणाच आडस पार थकून गेलं होत.अशातच सकाळच्या प्रहरी गावातील गावठी कुत्र्यांनी त्या पाडसावर प्राणघातक हल्ला करून त्याला जखमी केले.त्याच वेळी गावाशेजारीच शेत असल्याने शेतात फेरफटका मारायला अजय तीतरे गेले असता कुत्र्याची झुंड त्या पाडसावर हंल्ला करतांना दिसली.त्यामुळे अजय तीतरे यांनी त्या कुत्र्यांना तीथून पळवून लावून त्या हरणाच्या पाडसाला त्यांच्या तावडीतून सोडवले..त्या पाडसाला घेवून ते थेट गावात आले…गौलखेडचे पोलीस पाटील विजय घाईट यांनी जळगाव जामोद वनविभागाला माहिती देताच वनविभागाचे खोलगडे साहेब व त्यांचे कर्मचारी घटणास्थळी दाखल झाले…तीथेच त्या पाडसावर प्रथोमपचार करून त्या हरणाच्या पिंल्लाला पुढील औषधोपचार करण्यासाठी डाँक्टरांकडे घेवून गेले.वनविभागाचे सानप साहेब, दंडे साहेब,खोरगड साहेब यांनी लगेच या घटनेची दखल घेवून त्या पाडसाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले…त्यामुळे त्या लहाण पाडसाचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आले.खरे तर अजय तीतरे जर आपल्या शेतात गेले नसते तर त्या गावठी कुत्र्यांनी त्या पाडसाचे लचके तोडले असते व त्यामुळे त्याचा मृत्यु सुद्धा झाला असता.यावेळी पत्रकार सागर झनके, ग्रामपंचायत कर्मचारी भागवत झालटे,यांच्या सह ग्रामस्थांनी मोलाची मदत केली.