खामगाव : येथिल सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश जगदीश अग्रवाल यांच्या अग्रवाल हॉस्पिटल नांदुरा रोड येथे रावीवार दि.१८ जुलै रोजी सकाळी १० ते ३ पर्यंत मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये बी. एम. डी. टेस्ट म्हणजेच हाडातील ठिसूळपणाची तपासणी मशीनी द्वारे करून त्या संबंधीत उपचार व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. या मध्ये गुडघ्याचे दुखणे, मान दुखी, कम्बर दुखी, खांद्यांचे आजार, मणक्यांचे आजार, सन्धीवात इत्यादी आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
ऐक्स-रे ची आवश्यकता असल्यास ५० टक्के सुट देण्यात येणार आहे. तरी संबंधीत रुग्णांनी अग्रवाल हॉस्पिटलच्या मो. नं. 8605779989, 7218998933 वर १७ जुलै पर्यंतच नाव नोंदणी करून या सुवर्ण सेवेचा लाभ घ्यावा तसेच कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन अग्रवाल हॉस्पिटल खामगाव च्या वतिने करण्यात आले आहे.