निर्भिड स्वराज्यच्या बातमीचा दणका..
खामगांव : नुकत्याच जिल्हा अंतर्गत पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रदीप त्रिभुवन यांनी काही दिवसांपूर्वीच शहर पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळला आहे. कार्यभार सांभाळताच ठाणेदार प्रदीप त्रिभुवन हे शहरात चर्चेचा विषय बनले होते. ठाणेदार त्रिभुवन यांनी कार्यभार सांभाळताच शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी रांगच लावली होती. अनेक अवैध धंदे करणारे मोठमोठे पुष्पगुच्छ घेऊन ठाणेकरांच्या भेटीला पोलीस स्टेशनमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. अशातच नवीन आलेले ठाणेदार यांना सावध करण्यासाठी निर्भिड स्वराज्यने श्री “गणेश” गोत्यात आणनार याबाबताची बातमी लावली होती. पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला त्या श्री “गणेश” ला बुलडाणा हेडकॉटर अटॅच केले आहे.
तो श्री “गणेश” पोलीस कर्मचारी ठाणेदार आले त्या दिवसापासून त्यांच्या केबिनमध्ये श्री “गणेश” करत ठाण मांडून बसला होता. त्या ठाण मांडून बसलेल्या पोलीस कर्मचारी विरुद्ध काही वर्षांपूर्वी पैसे घेताना एक नव्हे तर दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्या व्हिडिओ वरुन फार मोठा गदारोळ पोलीस विभागात झाला होता. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधे असताना वादग्रस्त झाल्यानंतर तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक यांनी बुलढाणा येथे अटॅच केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा खामगाव शहर पोलीस येथे बदली करून पाठवण्यात आले होते. येथे आल्यानंतर पुन्हा आपले पराक्रम त्यांनी सुरूच ठेवले व या वेळेस शहर पोलीस स्टेशन मध्ये पैसे घेतांनाचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर त्याला निलंबित करून त्या प्रकरणावर दुसऱ्यांदा त्याला बुलढाणा येथे मुख्यालय अटॅच करण्यात आले होते. मात्र सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये त्याची बदली करण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात एका महिला कर्मचाऱ्या सोबत अडकला होता. त्यावेळी तिसऱ्यांदा तत्कालीन पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी सदर कर्मचाऱ्याला निलंबित करून बुलढाणा येथे मुख्यालय अटॅच केले होते. मात्र काही महिन्यानंतर सदर कर्मचारी राजकीय दबावतंत्र वापरून पुन्हा आपल्या कर्तव्यावर श्री “गणेश” करत रुजू झाला होता. त्यानंतरही त्या कर्मचाऱ्याने आपल्या अंगात असलेले नाविन्यपूर्ण गुण दाखवणे बंद केले नाही तर, अनेकांना निरनिराळ्या प्रकारे त्रास देणे त्याने सुरू ठेवले होते. त्याच्या या सर्व प्रकाराची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांना अनेकदा दिली होती.
मात्र त्या तक्रारींना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे, अशी चर्चा तक्रारदार करत होते. सदर कर्मचारी रेतीच्या गाड्यांचे हफ्ते सुद्धा जबरदस्तीने गोळा करत असल्याची चर्चा रेती वाहतूक दारामध्ये रंगली होती. निर्भिड स्वराज्य ने बातमी लावल्या नंतर काही दिवसांअगोदर शहर पोलीस स्टेशनमधे “कलकल” करणारी एक महिला कर्मचारी यांच्या सोबत श्री “गणेश” करून वरली लावणाऱ्या दोघांना पोलीस स्टेशनला बोलाऊन एका खोलीत बंद दाराच्या आड़ चर्चा करून हफ्ता वाढवण्यासाठी पैशाची मागणी केल्याची खमंग चर्चा शहरात नागरिक करताना दिसत आहे. निर्भिड स्वराज्य ने बातमी लावल्यावर शहरातील एका पत्रकाराला हाताशी धरून पहिल्याच पानावर हाफ पेज मध्ये ठाणेदार व त्या श्री “गणेश” कर्मचारी याने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. एका दिवसात नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांना कर्मचाऱ्यांबद्दल काय माहिती असणार ? मात्र अवैध धंद्यां बाबत एका दिवसात माहिती घेतल्याची चर्चा अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये दुसऱ्याच दिवशी सुरू होती. हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे. मात्र निर्भिड स्वराज्यच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे सांगू इच्छितो की, निर्भिड स्वराज्य कोणाच्याही किंवा कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून बातमी छापत नाही. तर झालेल्या घटनेची सत्यता तपासून पुढे होणाऱ्या धोक्यापासून सावध करण्याकरिता निर्भिडपणे बातमी लावतो व न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. तसेच निर्भीड स्वराज्यची बातमी ही नव्यानेच रुजू झालेल्या ठाणेदारांना सावध करण्यासाठी होती व वरिष्ठ कर्मचाऱ्यांना त्या श्री “गणेश” कर्मचाऱ्याच्या सुरू असलेल्या सेटलमेंट कारवाईबाबत माहिती देणे गरजेचे असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा याबाबतची सत्यता समोर आणणे महत्वाचे होते. जेणेकरून पोलिस विभागावर त्या कर्मचाऱ्यांमुळे गदा येणार नाही. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्भिड स्वराज्यच्या बातमीची दखल घेत त्या श्री ”गणेश” ला बुलढाणा येथे चौथ्यांदा अटॅच केले आहे. यावरून एकच लक्षात येते की त्या श्री “गणेश”ला खामगाव लाभी नसल्याचे दिसून येत आहे.