December 14, 2025
खामगाव जिल्हा नागपुर बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ

अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा….

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे व अन्य एका अधिकाऱ्याला महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. मात्र, सचिन वाझे प्रकरणात बदलीची कारवाई झाल्यानं आकसातून सिंग यांनी हे आरोप केल्याची भूमिका सरकारनं घेतली होती. तसंच, सिंग यांनी दबावाखाली येऊन हे आरोप केल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेत, देशमुख यांच्यावर आपण केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टाने सीबीआय चौकशीचे निर्देश दिले आहेत. ‘हे अभूतपूर्व प्रकरण आहे. खुद्द मुंबई पोलिस आयुक्तांनीच गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याने आम्ही प्राथमिक चौकशीचा आदेश देत आहोत,’ असं न्यायालयानं नमूद केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अनिल देशमुख यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या पदाचा व घराण्याचा मान राखत कारवाई करावी, असं फडणवीस यांनी म्हटलं होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह काही मोठे नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत देशमुख यांच्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Related posts

नकली नोटांचे मोठे रॅकेट पकडण्यात पोलिसांना मोठे यश….

nirbhid swarajya

काँग्रेस परिवार जळगांव जा.विधानसभा तर्फे शहिद भाकरे परिवाराला १,११,१११/- रु. ची आर्थिक मदत

nirbhid swarajya

नगरपरिषद खामगाव इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईंट फक्त नावालाच का?…

nirbhid swarajya
error: Content is protected !!