April 18, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा सामाजिक

अखेर अभिषेक अग्रवाल याची लॉयन्स क्लब अध्यक्ष पदावरून हकालपट्टी

खामगाव : येथील आदर्श नगर भागात राहणारे लॉयन्स क्लबचे अध्यक्ष अभिषेक अग्रवाल यांच्यावर ९ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिषेक अग्रवाल याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

त्यामुळे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या लॉयन्स क्लब कडून अभिषेक अग्रवाल याची तात्काळ अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अभिषेक अग्रवाल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी लॉयन्स क्लबने एक सभा बोलावून त्यामध्ये अभिषेक अग्रवाल यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याचा ठराव घेण्यात आला. अभिषेक अग्रवाल १ जुलै २०२१ पासून लॉयन्स क्लबचा अध्यक्ष होता. या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत त्यांचे सदस्यत्व सुद्धा काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे सध्या अध्यक्षपदाची धुरा लॉयन्स क्लबचे उपाध्यक्ष महेश चांडक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

या अगोदर सुद्धा लॉयन्स क्लबचा भाग असलेला लिओ क्लब मधील मुलींसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न या आधी सुद्धा त्याने केला होता मात्र सदर प्रकरण सुद्धा रफादफा करण्यात आले होते अशी खमंग चर्चा सुद्धा खामगाव मधील नागरिकांमध्ये सुरू आहे. लॉयन्स क्लबमधील वरिष्ठांनी या घटनेची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी झाल्यावर तात्काळ ही कारवाई करण्यात आली आहे.

Related posts

संग्रामपूर तालुक्यातील तामगाव ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता!शेत रस्ता झाला मोकळा

nirbhid swarajya

लॉकडाऊन मध्ये माझ्या मित्रासोबत झालेला एक अनोखा किस्सा

nirbhid swarajya

खासदार राहुल गांधी यांनी घेतले श्रींचे दर्शन…

nirbhid swarajya
error: Content is protected !!