खामगाव:हिंदवी स्वराज्य संस्थापक,अखंड हिंदुस्थान चे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकदिनी ६ जून रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियम येथील पुतळ्यास अखिल भारतीय मराठा महासंघाचे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख श्री रमाकांतजी गलांडे,मराठा समाज सेवा मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेशभाऊ घाडगे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनाही अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी जेष्ठ साहित्यीक तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष रामदादा मोहिते राजेंच्या शौर्यावर ऐतिहासिक दाखले देऊन प्रकाश टाकला. उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती श्री शिवराय व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या सन्मानार्थ गगनभेदी घोषणा दिल्या.कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा महासंघाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष संजय शिनगारे,शहर अध्यक्ष किशोर भोसले, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सोले,माजी शहर अध्यक्ष प्रवीण कदम,माजी शहर अध्यक्ष राजेश मुळीक,मराठा समाज सेवा मंडळाचे माजी सचिव राजेश काळे,जेष्ठ समाजसेवक डीगांबर गलांडे,सुदाम पाडोळे,गजानन मुळीक, महादेव सुकाळे, कडूचंद घाडगे,गजानन कापले,संजय घोगरे, शशिकांत वखरे,बबन पोकळे,गजानन केवारे,पांडुरंग काळे,नितीन पोकळे,हरीश रेठेकर, गजानन फंड,गजानन शिंदे,निखिल घाडगे,विक्की रेठेकर, विशाल घोडके,आकाश शिंदे,कैलास कदम,सुरेश भराटे, बंटी ढास यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.