अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी संजयजी शिनगारे यांची नियुक्ती
खामगाव : येथील छत्रपती शिवाजी नगर भागातील मराठा समाज सभागृहामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बुलढाणा जिल्ह्यातील नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीचे पत्र प्रदान करणे व पदग्रहण करण्या करिता व सोबतच नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार करण्याकरिता आयोजित केलेली अखिल भारतीय मराठा महासंघाची सत्कार समारंभाची सभा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा बुलढाणा व खामगाव येथील सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने मराठा समाज सभागृह येथे नवीन बुलढाणा जिल्हाअध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्याकरिता व नवनियुक्त पदाधिकार्यां चा सत्कार करण्याकरिता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी विनोदी लेखक खामगाव रत्न अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते रामदादा मोहिते हे होते तर प्रमुख उपस्थितीत खामगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ माने तसेच जिल्हा संपर्कप्रमुख रमाकांतजी गलांडे मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ बोंद्रे, चंद्रकांत रेठेकर माजी अध्यक्ष मराठा समाज सेवा मंडळ, माजी जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक प्रवीण भाऊ कदम, माजी शहराध्यक्ष राजेश भाऊ मुळीक हे होते. सभा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ व छत्रपती शिवराय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व मा जगदंबेचे पूजन करून तसेच माल्यार्पण करून मोठ्या प्रमाणात आतिषबाजी तसेच जय घोष करीत गगनभेदी घोषणा देऊन सुरुवात करण्यात आली त्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आ. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले उपस्थित प्रमुख मान्यवरांचे मराठा समाज बांधवांच्या वतीने मोठ्या थाटामाटात शाल श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
त्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजय शिनगारे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष रामदादा मोहिते यांच्या हस्ते व उपस्थित मराठा समाज बांधवांच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्रजी कोंढरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार यांच्या सहीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. सोबतच त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती अनिता ताई तनपुरे यांचा व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवनियुक्त शहराध्यक्ष सौ मिलनताई प्रवीण कदम, अखिल भारतीय मराठा महासंघाचे नवनियुक्त शहराध्यक्ष किशोर आप्पा भोसले यांचा उपस्थित समाज बांधवांच्या वतीने सस्नेह शाल व श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संपर्कप्रमुख रमाकांतजी गलांडे यांनी केले यानंतर नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती अनिता ताई तनपुरे यांनी व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजयजी शिनगारे यांनी सत्काराला उत्तर देतांना यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदादा मोहिते यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले याप्रसंगी ते म्हणाले की अखिल भारतीय मराठा महासंघाचे संपूर्ण जिल्हाभर तसेच खामगाव शहरामध्ये अनमोल असे कार्य मागील काळामध्ये कार्यरत असलेल्या पदाधिकार्यांनी करून संघटनेचे नाव लौकिक केले आहे त्यांचे हे कार्य पुढे सुद्धा अविरत सुरू राहावे याकरिता या नवनियुक्त पदाधिकार्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात येत आहे ही जबाबदारी आपण सर्व नवनियुक्त पदाधिकारी सांभाळण्यास सक्षम व परिपूर्ण आहे असा मला विश्वास आहे आपण पुढील काळामध्ये उत्कृष्ट असे चांगले कार्य करून समाज संघटन मजबूत करावे. मला अभिमान आहे की खामगाव शहरामध्ये मराठा समाज बांधव हे विविध राजकीय पक्षांमध्ये आपापले वजन ठेवून कार्यरत असतानासुद्धा सामाजिक व्यासपीठावर आपले राजकीय विचार दूर ठेवून एकत्र येऊन समाज सक्षम करण्यासाठी प्रत्येक वेळी कार्य करीत आले आहेत व यापुढेही करत राहील यात तिळमात्र शंका नाही असे बोलून त्यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांना आपले आशीर्वाद देऊन आपले मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमाचे संचलन बंडूभाऊ घाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्रजी काळे यांनी केले यानंतर नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजय शिनगारे यांनी छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. यावेळी उपस्थित समस्त समाज बांधवांनी जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय अखिल भारतीय मराठा महासंघाचा विजय असो अश्या गगनभेदी घोषणा देऊन आतिषबाजी केली. यानंतर उपस्थित सर्व समाज बांधवांनी नवनियुक्त सर्व पदाधिकार्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्याम पाडोळे, संभाजी बोरकर, संजय राऊत, श्रीकांत राऊत, सचिन कापले, गणेश कापले, दिगंबर गलांडे, विकास चव्हाण, सुरेश घाडगे, तानाजी राऊत, संजय मोहिते, संजय अवताडे, शेषराव खोसे, विनोद साळुंखे, देवीदास सुकाळे, दिपक ढमाळ, विनोद धांडे, संजय घोगरे, संजय शिंदे, गजानन मुळीक, शैलेश सोले, गजानन केवारे, सागर मोटे, निखिल काळे, गणेश जाधव, गजानन बागल, मुन्ना बोंद्रे, नितीन पोकळे, सागर मोरे, सचिन कापले, बाबा पऊळ, तानाजी सुरोशे, मंगेश मुळीक, अमर सांगळे, बाबा जोगदंड, मनीष केवारे, निखील घाडगे, विक्की रेठेकर,उदय मोहिते, रवी शिंदे, देवानंदन यादे, चंद्रकांत मुंडीवाले, अजय पवार, निलेश भोसले, किशोर लोखंडे, राम शिंदे, राहुल शिंदे, जीवन जाधव, राहुल बागल, गोविंद पवार, राहुल जाधव, राहुल गांडाळ, विशाल भंवर, बंटी ढास तसेच सौ. अनिताताई पाडोळे, सौ. प्रितीताई पाडोळे, कु. संचिता शिनगारे यांचे सह समाजातील जेष्ठ- श्रेष्ठ समाज बांधव तसेच युवक मोठया संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.