आर्थिक आधारावर आरक्षणाची मागणी;देशभर सामाजिक समरसतेची जनजागृती
खामगाव:आर्थिक आधारावर आरक्षण, सामाजिक समरसता आणि क्षत्रिय महापुरूषांच्या इतिहासाच्या संरक्षणासाठी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्यावतीने ९ आॅगस्ट ते ७ आँक्टोबर या कालावधीत तिसरी देशव्यापी रथयात्रा आयोजित केली आहे. या रथयात्रेचे अखिल भारतीय क्षत्रिय महासभा बुलडाणा जिल्हा शाखेच्यावतीने गुरूवारी खामगाव येथील चिखली बायपास चौकात स्वागत करण्यात आले.अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्यावतीने राजतिलक भवन, जम्मू येथून ९ आँगस्ट रोजी तिसऱ्या देशव्यापी रथयात्रेला प्रारंभ करण्यात आली. पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश मार्गे ही रथयात्रा गुरूवारी खामगावात पोहोचली. यात्रेसोबत राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्रसिंह तवर, उपाध्यक्ष विजयसिंह परिहार, ग्रुप कप्तान जे.पी.सिंह, सरदारसिंह परिहार, आशुतोषसिंह शेखावत, भगतसिंह ठाकूर, अयोध्या येथील जगद्गुरू श्री बाल मुकुंदाचार्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्रसिंह चौहाण, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजयसिंह सेंगर, विनोदसिंह ठाकूर , प्रदीपसिंह राजपूत आदी मान्यवरांचा सहभाग असून रथयात्रेदरम्यान देशभर सामाजिक समरसतेबाबत जनजागृती केली जात आहे. यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदसिंह पाटील, महासचिव गजेंद्रसिंह राजपूत, सुरेशसिंह तोमर, नारायण राजपूत, भरत चव्हाण, विजयसिंह इंगळे, जीवनसिंह इंगळे, रविंद्रसिंह इंगळे, विलास इंगळे, गोकुल इंगळे, संतोष इंगळे, विजय इंगळे, प्रकाशसिंह राजपूत, जगदिश इंगळे, शिवाजी चव्हाण, विलास इंगळे, किशोरसिंह राजपूत, बाळूसिंह इंगळे, सुदर्शनसिंह इंगळे, नरेंद्र इंगळे, उमरावसिंह चव्हाण, शेषराव इंगळे, मुन्ना पाटील, मनोहर बोराडे, आदींची उपस्थिती होती.