खामगाव:अखिल भारतीय कलवार कलाल कलार महासभेच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी गणेश जगन्नाथ चौकसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.गणेश चौकसे यांची समाजाप्रती असलेली सामाजिक भावना,समर्पण व कर्तव्य लक्षात घेऊन अखिल भारतीय कलवार कलाल कलार महासभेतर्फे बुलढाणा जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे . संस्थेची घटना व नियम आणि हक्क व कर्तव्य यांचे पालन करून आपण संस्था व समाजाला नवीन उंचीवर नेतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.तसेच गणेश चौकसे नेतृत्वाखाली बुलडाणा जिल्ह्यातील समाज , शिक्षण,रोजगार आणि इतर क्षेत्रात प्रगती कराल अशी आशा व्यक्त करून लवकरच जिल्हा कार्यकारिणी स्थापन करावी असे नियुक्ती पत्रकात नमूद करण्यात आले आहे.सदर नियुक्ती अखील भारतीय कलवार कलाल कलार महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कमल मालवीय यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.