खामगांव : सध्या कोरोना ह्या विषाणूजन्य आजारामुळे संपूर्ण जगात थैमान घातले आहे. तसेच भारतात देखील कोरोना मुळे लॉक डाऊन करण्यात आलेले आहे अशा परिस्थितीत पाच पाच ते सहा महिन्यापासून मेहनत करून अक्षय तृतीया साठी घागर बनवण्याचे काम करणारे कुंभार समाज बांधवांना त्यांनी बनवलेले मातीचे घागर विकण्यास परवानगी देण्यांत यावी अशी मागणी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांनी केली आहे.
कुंभार समाज हा अतिशय कष्टीक असून जवळपास ५ ते ६ महिने मेहनत करून “अक्षय तृतीयेला” मातीच्या घागरी तयार करतात व ते विकतात. परंतु लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्यामुळे त्यांनी बनविलेल्या घागरी, पाण्याचे माठ, पक्षांचे पाणी पिण्याचे पात्र इत्यादी तयार करून ठेवले आहे, परंतु ते विकण्यास परवानगी मिळाली नाही तर त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होइल, कारण केवळ अक्षय तृतीयेलाच ह्या घागरी, माठ, व पाण्याचे पात्र हे विकल्या जातात बाकी वर्षे भर त्यांना उत्पन्नाचे साधन नसते, त्यामुळे त्यांना हे विकण्याची परवानगी उन्हाळ्यातच नाही मिळाली तर त्यांचे वर्षभराचे नुकसान होईल त्यामुळे त्यांनी बनवलेली ही घागर, माठ इ. ही त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना विकण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी व सूचना आमदार आकाश फुंडकर यांनी केली आहे. अक्षय तृतीया साठी कुंभार समाजातील लोक जवळपास पाच ते सहा महिन्यापासून मेहनत करून घागरी बनवतात त्यासोबतच ते पक्ष्यांना पाणी देण्यासाठी पात्र बनवतात व माणसांना पिण्यासाठी माठ बनवतात. हा त्यांच्या हाताने तयार केलेला सर्व माल अक्षय तृतीया दरम्यान विकल्या जातो आणि त्यातुन मिळवलेल्या पैशातून ते वर्षभराचा उदरनिर्वाह करतात, त्यामुळे ही बाब आमदार आकाश फुंडकर ह्यांच्या लक्षात आली त्यामुळे त्यांनी मतदार संघाचे जागृत पालक म्हणून सदरचा माल कुंभार समाज बांधवांना शासनाच्या दिशा निर्देशानुसार त्यांना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी हा माल विकण्याची परवानगी देऊन, त्यांना कोरोना या आजाराच्या पासून वाचण्यासाठी देण्यात आलेले दिशानिर्देशांचे पालन करून सोशल डिस्टन्ससिंगचे नियम पाळून त्यांना अक्षय तृतीया निमित्त घागर माठ पक्ष्यांचे पाणी पिण्याचे पात्र इ विकण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार एडवोकेट आकाश फुंडकर यांनी केली आहे