April 19, 2025
जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ संग्रामपूर

अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांची लूट थांबले तरी केव्हा? नियमबाह्य वसुली व करतात दादागिरी, वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज…

संग्रामपूर: तालुक्यातील आदिवासी गाव वसाली येथे पर्यटकांसाठी अंबाबरवा अभयारण्याची निर्मिती करण्यात आली असून येथील अधिकारी व कर्मचारी नियमबाह्य वसुली करून दादागिरीची भाषा पर्यटकासोबत वापरतात या गंभीर विषयाकडे वरिष्ठांनी जातीने लक्ष देऊन या मुजोर कर्मचाऱ्यांना समज द्यावी अशी मागणी परिसरातील पर्यटन करीत आहेत.असल्याने परिसरातील पर्यटन वसाली येथील इको सायन्स पार्क पाहण्यासाठी खूप गर्दी होते. या पार्कचे १२ वर्षावरील व्यक्ती साठी २० रुपये तर लहान मुलांसाठी १० रुपये शुल्क आकारण्यात आले असून चार चाकी, दुचाकी पार्किंग शुल्क वेगळे आकारण्यात आले आहे.परंतु गेटवरील कर्मचाऱ्यांनी ओळखीच्या लोकांना कोणतेही शुल्क न आकारता काही पर्यटक इको सायन्स पार्क मध्ये चारचाकी व दुचाकी गाड्या आत घेऊन गेले तर काहींसोबत हे कर्मचारी यांनी वाद घालून दादागिरीची भाषा वापरून पर्यटकांना वेठीस धरले.असा मुजोर व कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पर्यटन करीत आहेत.सीसीटीव्ही फुटेज बघून मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी मी व माझे कुटुंब २१ ऑगस्ट रोजी इको सायन्स पार्क पाहण्यासाठी गेलो असता गेटवरील कर्मचाऱ्यांनी विनाकारण जास्त शुल्क आकारले त्यांना पावती मागितली असता दिली नाही व दादागिरीची भाषा वापरत होते व इको पार्क हॉटेल ग्रीन पार्क मध्ये सुद्धा अरेरावीची भाषा हॉटेल चालक वापरत होते या सर्व प्रकाराची सीसीटीव्ही फुटेज पाहून या मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी
वी सिरस्कार,पर्यटक करीत आहेत. चौकशी करून कारवाई करण्यात येईल
21 ऑगस्ट रोजी गेटवरील कर्मचाऱ्यांनी काही पर्यटकांना त्रास दिला असे मला फोन आले. मी स्वतः त्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. एस.बी.वाकोडे वनपरिक्षेत्रअधिकारी यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले

Related posts

ई-पासपोर्ट तयार करण्यासाठी डिजी-लॉकरची लिंकही देता येणार

nirbhid swarajya

क्रिकेट अकॅडमीचे विद्यार्थी जळगावात चमकले

nirbhid swarajya

खामगाव राष्ट्रवादी तर्फे अब्दुल सत्ताराचा निषेध करत केले आंदोलन…

nirbhid swarajya
error: Content is protected !!