खामगांव : खामगांव येथील गजानन कॉलनी भागातील शिक्षक इंगळे यांच्या घरा समोर टाटा मॅजिक व दुचाकीला आग लागल्याची घटना ३ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. अंकुश हटकर यांच्या उभ्या असलेल्या टाटा मॅजिक एम एच २८ आर २९३४ वाहनाला अचानक आग लागली. यामध्ये गाडी पूर्णपणे जळुन खाक झाली तर बाजूला उभी असलेली दुचाकी क्र. एम एच २८ एडी १८९२ सुद्धा जळाली आहे. स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच ही आग विझवण्यात आली. या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून दोन्ही वाहनांचे लाखोंचे नुकसान झाले असल्याची माहिती अंकुश हटकर यांनी दिली आहे. ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याची माहिती मिळाली आहे.
previous post