खामगाव : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी पणन महासंघाचे अध्यक्ष,विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते,लोकसभेचे सर्वोत्कृष्ट संसदपटू, राज्याचे माजी कृषिमंत्री सर्वसामान्याचे लोकनेते स्वर्गीय पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३१ मे रोजी जिवलग मित्र ओंकारआप्पा तोडकर यांनी तोडकर परिवाराच्या वतीने स्थानिक सामान्य रुग्णालयात लॉयन्स अन्नछत्र उपक्रमाद्वारे रुग्णांच्या नातेवाईकांना भाजी, पोळी, मसाले भात व मोतीचूर लाडु चे अन्नदान करण्यात आले.
स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त सुद्धा दरवर्षी स्थानिक टिळक राष्ट्रीय विद्यालय येथे अन्नदान करण्यात येत असते.स्थानिक सामान्य रुग्णालयात अन्नदान कार्यक्रमाला ओंकार आप्पा तोडकर यांच्यासह तानाजी घोगरे, सुरेश घाडगे, श्याम आंबेकर, राजेश मुळीक, संजय घोगरे, संजय मोहिते, किशोर गरड, शैलेश सोले, धनंजय मोहिते, नाना पवार, रवींद्र शिंदे,सागर मोरे,गणेश कापले सह ओंकारआप्पा तोडकर मित्र परिवार चे सदस्य उपस्थित होते. अशी माहिती प्रसाद तोडकर यांनी दिली.