खामगाव : मराठा पाटील सेवा मंडळ खामगाव यांच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 7 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मराठा पाटील सभागृह ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ आयोजित केला आहे. यामध्ये दहावी व बारावी परीक्षेमध्ये 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी, 5वी व 8 वीचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थी व जेईई, नीट मध्ये 500 पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी व इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.पात्र विद्यार्थ्यांनी आपली नावे व गुणपत्रिका व्हाट्सअँप किंवा पुढील पत्त्यावर 1 जुलै 2024 पर्यंत पाठवावी. यासाठी पाटील किराणा घाटपुरी नाका, सागर झेरॉक्स जलंब नाका, सुधाकर डुकरे अमृत नगर तसेच प्रभाकर लांजुडकर अध्यक्ष मो. 9422180070, आशुतोष लांडे सचिव मो. 8805489289, बी. डी. पाटील विश्वस्त मो. 9881229598 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अमरावती क्रीडा खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ विविध लेख शिक्षण शेगांव सामाजिक