December 4, 2024
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा कार्यकारणी गठीत

स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुण्य़तिथी दिनाचे औचित्य

खामगांव : “शत प्रतिशत भाजपा” चा नारा देत बहुजनांना सोबत घेऊन संघटन सशक्त़ करणाऱ्या भाऊसाहेबांच्या पुण्यतिथी दिनी भाजपा विद्यार्थी आघाडी बुलढाणा जिल्हयाची कार्यकारणी गठीत करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे,आमदार श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा विद्यार्थी आघाडी बुलढाणा जिल्ह्याची कार्यकारणी गठीत करण्यात आली. लोकनेते स्व़.भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुण्य़तिथी दिनी त्यांचा “शत प्रतिशत भाजपा” हा नारा तरुणांमध्ये रुजविण्यासाठी देशभक्तीच्या विचाराने प्रेरित विद्यार्थ्यांना भाजपाशी जोडण्यासाठी भाजपा विद्यार्थी आघाडीची जिल्हा कार्यकारणी आज विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड यांनी घोषीत केली. यामध्ये सरचिटणीस पदी आशिष सुरेका (खामगाव), ऋषिकेश नालिंदे (चिखली), आदित्य उदयकार (मोताळा), ऋषिकेश देशमुख (सिंदखेड राजा), वैभव आढाव (जळगाव जामोद), जितेंद्र मोरे (मलकापूर), विकास काकड(देऊळगाव राजा) उपाध्यक्ष पदी पवन ठाकूर (खामगाव), विजय दिवाने (चिखली). नितीन काळे (मेहकर), आकाश काळे (भट), मोहन रावणकर (संग्रामपूर), सागर जयस्वाल (मलकापूर), चेतन पाटील (चिखली), आकाश लटके (मलकापूर) रितेश अग्रवाल (जळगाव जामोद)

सचिव पदी सुपेश साखरे (खामगाव) संकेत पाटील (चिखली) अभिषेक देशमुख (बुलढाणा) वैभव तुपकर (सिंदखेड राजा) विनोद भुसारी (मेहकर) गोपाल तायडे (जमाठी) सहसचिव पदी राहुल जाधव (खामगाव) नकुल राज लोंढे (चिखली) विनायक लोगो रे (मेहकर) तेजस भंडारी (बुलढाणा) मोहन सोनवणे (संग्रामपूर),सतीश गीते(देऊळगाव राजा) सोशल मीडिया प्रमुख पदी प्रीतम चव्हाण,वेदांत पाठक यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच कायम निमंत्रित सदस्य मधे मा आमदार चैनसुखजी संचेती, आमदार संजूभाऊ कुटे,आमदार आकाशदादा फुंडकर, आमदार श्वेताताई महाले, योगेंद्रभाऊ गोडे, विजयराजसाहेब शिंदे, माननीय प्रदीप इलक, शिवराजभाऊ जाधव, सचिनबापू देशमुख,राकेशभाऊ राठोड राणा हे आहेत. अशी माहिती भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड यांनी एका प्रसिद्ध पत्रकारद्वारे दिली.

Related posts

जागतिक क्षयरोग दिन साजरा

nirbhid swarajya

राज्यातील ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी तात्काळ जिल्हानिहाय नियोजन होणे गरजेचे, वेळ पडल्यास आंदोलन करू – अशोक सोनोने,

nirbhid swarajya

महिलांमध्ये संताप : दारू विक्रेत्यांना अटक करा,संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी…

nirbhid swarajya
error: Content is protected !!